आरोग्य

             *⫷⫸⫷⫸❑❑⫷⫸*                       *▶आरोग्य विषयक सामान्य माहिती...*   

*1.🎯शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते.* आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते.  
*2.🎯तंबाखु सेवनाने रक्तातील प्राणवायूची जागा कार्बन मोनोऑक्साईड हा विषारी वायू घेतो.*  
*3.🎯व्यसन हा बराच काळ टिकणारा, भरपूर तोटा करणारा, फारच थोडे यश देणारा आजार आहे.* व्यसन हे  मूलतः विकास आणि विवेक विरोधी आहे.  
*4.🎯वेदानाशामक गोळ्या स्वत:च्या मर्जीनुसार न घेता, आधी डॉक्टरांचा सल्ला घेताल तर मुत्रपिंडाचे आजार होण्यापासून आपण वाचू शकतो.*  
*5.🎯अनेक व्यक्ती अतिशय साध्या दुखण्यावर देखील वेदनाशामक गोळ्या घेत राहतात. किडनीवर त्याचा विपरित परिणाम होत असतो.*  
*6.🎯केवळ अधिक खर्च करण्याने प्रकृती सुधारत नसते, किंवा विनाकारण घेत असणाऱ्या टॉनिक औषधांचा फायद होत नसतो. प्रकृती-स्वास्थ ही प्रत्येकाने स्वतःकरता कमविण्याची गोष्ट असते.*  
*7.🎯चांगल्या वाचनाने व मननाने मनाच्या सर्वच वृत्ती-प्रवृत्ती प्रसन्न आणि स्थिर राहतात.* त्याचा परिणाम शरीर स्वाथ्यावरही होतो. एवढेच नव्हे तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीवर अंशतः तरी होत असतो .
  *8.🎯एकाच घरामध्ये पारंपरिक पद्धतीने दात घासणाऱ्या आजोबांचे दात चांगले आहेत, तर गेली सलग २० वर्षे पेस्ट वापरणाऱ्या आधुनिक विचारांच्या मुलांचे दात खराब होऊ लागले आहेत.*  
*9.🎯पाश्चात्य संस्कृतिच्या खानपाणाचे वाढते प्रमाण यामुळेच लठ्ठपणा साथीच्या रोगप्रमाणे वाढत आहे.*  *10.🎯तरुणाई करीअर च्या मागे पळते आहे.जगच धावते आहे. या पळापळीत आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला? इथेच  हायपर टेन्शन ला सुरवात होते.*  *11.🎯चरबी वाढवणारे सर्वात महत्वाचे दोन अन्नघटक म्हणजे स्निग्ध पदार्थ व साखर*. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी साखर व तेलतूपादि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण मर्यादित ठेवणे सर्वात महत्वाचे आहे.  *12.🎯निरोगी रहायचे असल्यास उत्तम आहार घेणे अत्यावश्यक आहे.* या करता आपण जे खात आहात ते उत्तम दर्जाचे आहे की नाही यावर कटाक्ष हवा.  
*13.🎯काहीतरी नवीन शिकत राहिल्यास नर्वस सिस्टिम कायम कार्यरत राहते* तसेच तुमची स्ट्रेस लेवल कमी करून मेंदूला निरोगी ठेवते. 
 *14.🎯भरपूर झोप घेणे हे  स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते* नवीन, क्रिएटिव्ह गोष्टी सुचण्यासाठी योग्य झोप घेणे गरजेचे आहे.  
*15🎯.तुळस या वनस्पतीचे “अॅंटीव्हायरल” गुण उत्तम आहेत*. विषाणुजन्य आजारांपासून बचाव व संरक्षण करण्यासाठी तुळशीचा उत्तम उपयोग होतो.  *◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤*   

Comments